Pune News : पुणे : शिवाजीनगर भागात आमच्या परवानगीशिवाय कोणी काम करत नाही. या भागात काम करायचे असेल तर दरमहा दहा हजार रुपये खंडणी द्यावीच लागेल, अशी धमकी देवून, इंटरनेट पुरवठादार व्यावसायिकाकडे दरमहा दहा हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेने अटक केली.
तिघे गजाआड
पुण्यातील शिवाजीनगर भागातील दीपबंगला चौकात ही कारवाई करण्यात आली. (Pune News ) याप्रकरणी निखिल शिवा कांबळे (वय १९), अतुल अनिल धोत्रे (वय २१), तेजस शिवाजी विटकर (वय २१, तिघे रा. वडारवाडी, शिवाजीनगर) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
खंडणी विरोधी पथकाकडे याबाबतची तक्रार एका इंटरनेट पुरवठादार व्यावसायिकाने दिली होती. व्यावसायिकाच्या कामगारांकडून पांडवनगर भागात इंटरनेट केबल टाकण्याचे काम करण्यात येत होते. आरोपी कांबळे, धोत्रे, विटकर यांनी या कामगारांना धमकावले. तसेच काम करण्यास मज्जाव केला. (Pune News) त्यानंतर व्यावसायिकाने आरोपींकडे विचारणा केली असता, या भागात काम करायचे असल्यास दरमहा दहा हजारांची खंडणी द्यावी लागेल, असे सांगितले.
दरम्यान, आरोपींनी व्यावसायिकाला दहा हजार रुपये घेऊन दीपबंगला चौकात भेटण्यासाठी बोलावले. व्यावसायिकाने तक्रार दिल्यानंतर खंडणी विरोधी पथकाने सापळा लावून तिघांना पकडले. (Pune News ) पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, मोहनदास जाधव, विजय गुरव, प्रदीप शितोळे, सचिन अहिवळे आदींनी ही कारवाई केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान ९ नोव्हेंबरपर्यंत शस्त्र बाळगण्यास निर्बंध लागू
Pune News : वाघोलीत मराठा समाजाचे बेमुदत साखळी उपोषण
Pune News : ललित पाटीलला ससूनमधून पलायन करण्यास मदत; अऱ्हानासह तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी