Pune News : पुणे : निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा आणि हॉटेल-बांधकाम व्यावसायिक विजय ढुमे याचा शुक्रवारी संध्याकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास निर्घृण खून झाला. वडगाव बुद्रुक येथील क्वॉलिटी लॉजच्या पार्किंगमध्ये खुनाचा थरार रंगला. पार्किंगमधून बाहेर येत असताना दबा धरून बसलेल्या चार ते पाच जणांनी लोखंडी सळई आणि लाकडी, लोखंडी दांडक्याने हल्ला करत हा खून केला होता. या प्रकरणात पोलीस अॅक्शन मोडवर आले होते. अखेर विजय ढुमे याच्या खुनाचा उलगडा करण्यात पुणे शहर पोलिसांना यश आले आहे. ढूमे याचा खून अनैतिक संबंधातून झाला असून, सिंहगड रोड पोलिसांकडून आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. महिलेच्या प्रियकराकडूनच हा खून केल्याचे उघडकीला आले आहे.
खून अनैतिक संबंधातून
गणेश विसर्जन मिरवणुकीतील २९ तासांच्या बंदोबस्तामुळे पोलीस कर्मचारी थकले होते. त्यानंतर सिंहगड रस्त्यावर खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनंतर पोलीस अॅक्शन मोडवर आले. (Pune News) आरोपींना पकडण्यासाठी लागलीच सूत्रे हाती घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु केली. या माध्यमातून आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू केले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चार ते पाच आरोपी दिसत होते.
सासवडनजीक असलेल्या ढुमेवाडी येथील ढुमे हे मुळचे रहिवासी होते. विजय ढुमे हा निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा होता. त्याचे वडील पुणे शहर पोलीस दलात गुन्हेशाखा, सर्व्हेलन्स विभाग आणि निवृत्तीवेळी निगडी वाहतूक विभागात कार्यरत होते. त्यामुळे अनेक जणांबरोबर त्याची उठबस होती. (Pune News) अनेक पोलीस अधिकाऱ्यांशी त्याचे मैत्रीपूर्ण संबंध होते. त्याचे अनेक राजकीय व्यक्तींशी संबंध होते. हॉटेलच्या वादातून ढुमे यांच्यावर यापूर्वी एक गुन्हा देखील दाखल झाला होता. हॉटेल आणि बांधकाम व्यवसायाच्या निमित्ताने त्यांची अनेक अधिकारी, राजकीय व्यक्तींशी व्यावसायिक भागीदारी होती. मागील ३० वर्षांपासून हे कुटुंब पिंपरी-चिंचवडमध्ये स्थायिक झाले होते.
शनिवारी (३० सप्टेंबर) दुपारी काळेवाडी स्मशानभूमीत ढुमे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहरातील अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी, पोलीस वसाहतीतील मुले आणि राजकीय व्यक्ती उपस्थित होत्या. (Pune News) घटनेचे गांभीर्य लक्षात घेता काळेवाडी स्मशानभूमी परिसरात वाकड पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. ढुमे यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी दोन मुले असा परिवार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुण्यात आठ महिन्यांत १४ हजार ७२ नागरिकांना श्वानदंश
Pune News : हंगामाच्या समाप्तीला पुण्यात मेघगर्जनेसह पाऊस बरसणार