Pune News : पुणे : बांगलादेशी १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला बांगलादेशात पाठवण्याच्या बहाण्याने जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करुन घेणाऱ्या ५ जणांवर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मागील एक वर्षापासून मुंबई, चेन्नई आणि पुणे या ठिकाणी घडला आहे.
स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नईमा, शाहीकुल, बोवकार मंडोल, युसुफ, ताहीरा (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.(Pune News ) त्यांच्यावर पॉक्सो अॅक्ट, पिटा अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी १७ वर्षीय मुलीने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अल्पवयीन मुलगी हि मुळची बांगलादेशी आहे. गेल्या वर्षी भारतात आली होती. तीला नईमा या महिलेने भारतात काम मिळवून देण्याचे खोटे सांगून बांगलादेशातून विनापरवाना भारतात आणले. पालघर येथे तिचे भारतीय आधारकार्ड बनवून घेतले. (Pune News ) त्यानंतर तिला चेन्नई येथे नेण्यात आले. त्याठिकाणी नईमाच्या मामाने पीडित मुलीसोबत वारंवार अत्याचार केले.
ओळखीच्या बोवकार मंडोल याने मुलीला बंगालादेशात सोडतो असे खोटे सांगून मुंबई येथे त्याच्या घरी घेऊन गेला. तिच्यासोबत जबरदस्तीने लग्न करुन तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. तसेच तिच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला. आईने दिलेल्या काकाच्या नंबर फोन केला. (Pune News ) यावेळी सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे गेली असता आरोपी युसुफ याने तिला फोन केला. तुला बांगलादेशात सोडतो असे सांगून त्याची पुण्यातील तुळशीबागेत राहणारी बहिण ताहीरा हिच्याकडे आणून सोडले. ताहिराने मुलीकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करुन घेतला. पीडित मुलीने नकार दिला असता ताहीराने तिला शिवीगाळ करुन मारहाण करुन डांबून ठेवले.
दरम्यान, ससून हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याबाबत स्वारगेट पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने ससून हॉस्पिटलमध्ये जाऊन पीडित मुलीचा जबाब नोंदवून पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास स्वारगेट पोलीस करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : ड्रग्ज तस्कर ललित पाटील प्रकरणाचा तपास सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांच्याकडे
Pune News : पुणे रेल्वे स्थानकावरुन तब्बल ९० किलो गांजा जप्त ; दोन तस्करांना अटक
Pune News : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर; आता वंदे भारत एक्स्प्रेस पुण्यातून सुटणार…