Pune News : पुणे : डेक्कन परिसरातील इंडसइंड बँकेवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या आरोपींना डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून पोलिसांनी धारदार कोयते, दोरी, ब्लेड, व लोखंडी कटावणी, टेम्पोसह मुद्देमाल जप्त केला आहे.
दरोडा टाकण्याचे तयारीची चर्चा…
जसपालसिंग जपानसिंग जुन्नी (वय २०, रा. रेल्वे स्टेशनचे बाजुला भारतनगर पिंपरी चिंचवड), कुलदिपसिंग युवराजसिंग जुन्नी वय – २०, रा. गल्ली नं १० पाटील इस्टेट शिवाजीनगर पुणे), नसिबसिंग रणजितसिंग दुधानी, (वय – १८, रा. हनुमाननगर न्यु बुधवार पेठ सोलापुर), प्रसादसिंग जलसिंग भोंड, (वय १९, रा. रेल्वे स्टेशनचे बाजुला भारतनगर पिंपरी चिंचवड, गौरव शंकर राठोड, (वय १९, रा. गोल्डन चौक, आय बिल्डींग, चाकण ता. खेड, जि. पुणे) व अरुणसिंग चंदाशिंग भोंड (रा. पाटील इस्टेट पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डेक्कन पोलिसांचे पथक रविवारी (ता. २०) रात्रीच्या वेळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालीत होते. यावेळी गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, एचडीएफसी बँक, लॉ कॉलेज रोड डेक्कन पुणे येथील बिल्डींगचे बाजुला अंधारात मोकळया जागी ५ ते ६ इसम लोखंडी कोयत्यासारखे घातक शस्त्रे व एक चारचाकी टेम्पो घेवुन एकत्र जमलेले असुन दरोडा टाकण्याचे तयारीची चर्चा करीत आहेत. Pune News
खात्रीशिर बातमी मिळाल्याने पोलीस उप निरीक्षक महेश भोसले यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विपीन हसबनिस यांना फोनद्वारे सदरची माहीती दिली. वरीष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार सदर ठिकाणी जाऊन इसमाना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. ३ इसमांनी त्यांचेकडील ब्लेंडने अटक टाळण्याचे उददेशाने स्वतःचे पोटावर, हातावर वार करुन घेतले. Pune News
वरील सर्वाना स्टापच्या मदतीने त्यांचे हातातील ब्लेड काढुन घेतले ताब्यात घेतलेल्या इसमांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने घटनास्थळाचे आजुबाजुची पाहणी केली असता एक चारचाकी टॅम्पो उभा असल्याचे दिसले. यावेळी त्या सर्वांकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे वरीलप्रमाणे सांगितली. Pune News
दरम्यान, त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सांगितले कि इंडसइंड बँक डेक्कन पुणे येथे जावुन हत्यारांसह लुटमार करणार असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी दरोडयाच्या तयारीत असणा-या आरोपींना ताब्यात घेतले आहे. तपास उप-निरीक्षक दत्तात्रय सावंत करीत आहेत. Pune News
सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विपीन हसबनिस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक महेश भोसले, दत्तात्रय सावंत, सहायक पोलीस उपनिरीक्षक चव्हाण, शिंदे, पोलीस हवालदार निकाळजे, बोरसे, सुपेकर, गायकवाड, येळे, गोफणे भांगले तरंगे, तांबे गायकवाड बागुले, बडगे, पाथरुट, काळे, जाधव या पथकाने केलेली आहे