Pune News : हिंजवडी : करवसुलीबाबत नोटीस देण्यासाठी गेलेल्या ग्रामसेविकेला मारहाण करून, नोटीस फाडून टाकली. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या महिलेला एक वर्ष सक्तमजुरीसह २५ हजार रुपये दंडाची शिक्षा पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी (ता. ४) ठोठावली आहे. हे आदेश न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी दिले आहेत.
२०१२ साली केली होती मारहाण
अर्चना लक्षमण थोरवे (वय ४०, रा. कासारसाई, ता. मुळशी, जि. पुणे) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी नंदा कृष्णा माने (वय ४३, वाल्हेकर वाडी, एकविरा कॉलनी, भोडवे वस्ती गणेश मंदिर, चिंचवड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune News) हा गुन्हा २७ मार्च २०१२ रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नंदा माने या कासारसाई गावाच्या ग्रामसेविका म्हणून २०१२ साली कार्यरत होत्या. माने या ग्रामपंचायतीचे करवसुलीबाबत नोटीस देण्यासाठी आरोपी अर्चना थोरवे यांच्या घरी गेल्या होत्या. तेव्हा आरोपी थोरवे यांनी ग्रामसेविका माने यांच्या हातातील नोटीस चुरगळून फेकून दिली व त्यांचे दोन्ही हात धरून त्यांना चापट्या मारून सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केला.
याप्रकरणी ग्रामसेविका माने यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी आरोपी अर्चना थोरवे यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. (Pune News) गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी अर्चना थोरवे या महिलेला अटक केली होती.
संबंधित गुन्ह्याचा खटला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु होता. या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. नामदेव तरळगट्टी यांनी कामकाज पहिले. (Pune News) ॲड. नामदेव तरळगट्टी यांनी न्यायालयात केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून, न्यायालयाने आरोपी थोरवे या महिलेला एक वर्ष सक्तमजुरी व २५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिन्याची शिक्षा सुनावली आहे. हे आदेश न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी दिले आहेत.
दरम्यान, या खटल्यात सरकारी वकील ॲड. नामदेव तरळगट्टी यांना सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे, हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. मुगलीकर, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक पी. डी. पाटील, सहाय्यक फौजदार एन. टी. साळुंखे, पोलीस हवालदार आबा सांवत, मनोज गोसावी व महिला पोलीस सायली फडतरे यांची मदत मिळाली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुणे जिल्ह्यात जुन्या-नव्या ३८८ ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले; जोरदार मोर्चेबांधणी
Pune News : येरवडा कारागृहातील पोलीस शिपायावर गुंडाचा जीवघेणा हल्ला