Pune News : मुंढवा परिसरातील एका मेडिकल दुकानदाराने फुकटात कॅडबरी दिली नाही म्हणून दुकानाची तोडफोड करणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला. ज्या भागात या दोघांनी कोयता काढून गोंधळ घातला होता त्याच भागात पुणे पोलिसांनी भाईंची धिंड काढली आहे.(Pune News)
पुणे पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला.
रामेश्वर सावंत आणि अभिषेक संजय जरांडे अशी धिंड काढण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंढवा परिसरातील एका मेडिकल शॉपमध्ये जाऊन या दोन्ही आरोपींनी१६ जुलै रोजी काही चॉकलेट घेतले.(Pune News) दुकानदाराने या दोघांना चॉकलेटचे पैसे मागितले असता त्यांनी तू पैसे मागितलेच कसे, आम्ही कोण आहोत हे तुला माहीत नाही का असे विचारत हुज्जत घातली. इतकच नाही तर आरोपींनी कोयता काढून मेडिकल दुकानाची तोडफोड केली. यात मेडिकलचे मोठं नुकसान झाले होते.(Pune News)
दरम्यान, हे प्रकरण पोलिसात गेल्यानंतर पोलिसांनी अवघ्या बारा तासात या दोन्ही आरोपींना अटक केली. आरोपींनी ज्या ठिकाणी दहशत मोजण्याचा प्रयत्न केला त्याच ठिकाणी पोलिसांनी या दोघांची वरात देखील काढली आहे.(Pune News)