Pune News : पुणे : झटपट तिहेरी तलाक हा दखलपात्र गुन्हा आहे. हा गुन्हा करणाऱ्या गुन्हेगाराला जास्तीत जास्त तीन वर्षांचा तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो. असे असतानाही प्रापंचिक कारणावरून पतीने तीनदा तलाक… असे म्हणत महिलेला नांदवण्यास नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील वानवडी परिसरात उघडकीला आला आहे. या प्रकरणी पतीसह तिघांवर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पतीसह तिघांवर गुन्हा दाखल
तिहेरी तलाक विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यानंतर तोंडी, लेखी आणि अन्य कोणत्याही माध्यमातून ३ वेळा तलाक देण्यावर बंदी घातली आहे. (Pune News ) अशा पद्धतीने पत्नीला तलाक दिल्यास तो कायद्याने गुन्हा ठरतो. पतीविरूद्ध कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते. असे असतानाही वानवडी येथे डिसेंबर २०१६ ते ऑक्टोबर २०२३ या काळात हा प्रकार घडला. याबाबत ३४ वर्षांच्या महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात सोमवारी (ता. १६) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पतीसह दोघांवर एवोल्युशन ऑफ ट्रिपल तलाक अंडर द मुस्लिम वुमन प्रोटेक्शन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपीचा विवाह २०१६ मध्ये झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनी आरोपींनी फिर्यादी यांना प्रापंचिक कारणावरुन शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. (Pune News ) तसेच फिर्यादी यांचा मानसिक व शारीरिक छळ केला. त्यानंतर जिवे मारण्याची धमकी दिली. आरोपीने फिर्यादीला तीन वेळा तलाक… तलाक… तलाक… असे म्हणून सासरी येण्यास नकार दिला, असे फिर्यादीत नमूद केले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार राऊत करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : विद्यापीठातील मेसचालकांचा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; झुरळानंतर आता जेवणात आढळले किडे
Pune News : रुफटॉप हॉटेल्सवर कारवाईसाठी लवकरच समिती स्थापन करणार; पालकमंत्र्यांचे आदेश