हडपसर, (पुणे) : हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगार स्वप्नील ऊर्फ विट्या संजय कुचेकर याच्यासह टोळीतील ७ साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.
आरोपी नामे स्वप्नील बिठया ऊर्फ स्वप्नील कुचेकर (वय – २३, रा. मांजराईमंदीरा शेजारी, मांजराईनगर मांजरी बु) ता. हवेली), टोळी सदस्य पंकज गोरख वाघमारे (वय-२८, रा. बंटर शाळेजवळ गाडीतळ हडपसर, हर्षल सुरेश घुले (वय -२३ रा. शिवाजी पुतळया शेजारी मांजरी (बु) ता. हवेली), यांना दाखल गुन्हयात अटक करण्यात आली असुन ०३ विधीसंघर्षीत बालक यांना ताब्यात घेण्यात आले आहे व यातील दोन पाहिजे आरोपी यांचा शोध सुरू आहे.
स्वप्नील बिठया ऊर्फ स्वप्नील कुचेकर टोळीविरुद्ध गंभीर दुखापत, मालमत्तेचे नुकसान, नागरिकांमध्ये दहशत माजविणे, प्राणघातक शस्त्र बाळगणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
हडपसर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी पोलिस उपायुक्त परिमंडळ ०५ चे विक्रांत देशमुख यांचे मार्फत अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, रंजनकुमार शर्मा यांना प्रस्ताव सादर केलेला होता. रंजनकुमार शर्मा यांनी या प्रस्तावाची पडताळणी करून मोका कारवाईस मान्यता दिली. सदर गुन्हयाचा पुढिल तपास हडपसर विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त अश्वीनी राख हे करीत आहेत.
सदरची कामगिरी हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वास डगळे, संदिप शिवले सहायक पोलीस निरीक्षक सारिका जगताप, सहायक पोलीस निरीक्षक सचिन दाभाडे, निगराणी पथकातील पोलीस अंमलदार प्रविण शिंदे, गिरीश एकोर्गे, महेश उबाळे, राजश्री खैरे वसीम शेख बाबा शिंदे, अशोक आंधारे सर्व हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी कारवाई केली आहे.
दरम्यान, पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर २०२३ या चालु वर्षातील एकुण ७७ वी कारवाई केली आहे.