Pune News : पुणे : पुण्यात इस्रायलच्या राष्ट्रध्वजाच्या प्रतिकृतीचे स्टिकर्स लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या दृष्टीन हे स्टिकर्स लावल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी शहरातील तीन पोलीस ठाण्यांत वेगवेगळे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सईद पठाण आणि शाहनवाज शेख या दोघांनी हापिक शेख उर्फ नोन्या याच्याकडून इस्रायलच्या राष्ट्रध्वजाचे स्टिकर्स घेतले होते. (Pune News) त्यानंतर ते रस्त्यावर चिटकवले. याप्रकरणी पठाण, शाहनवाज आणि नोन्या याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
हमास आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धाला १७ दिवस उलटूनही दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर हल्ले सुरूच आहेत. अशातच पुण्यात नाना पेठेतील होप रूग्णालयाजवळील रस्त्यावर इस्रायलच्या राष्ट्रध्वजाचे स्टिकर्स चिटकवण्यात आले होते. (Pune News) याबाबतची माहिती मिळताच समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बांगदार यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, शुक्रवारी (ता. २०) भवानी पेठेतील चुडामन तालमीजवळील रस्त्यावर इस्रायलच्या राष्ट्रवध्वजाचे स्टिकर चिटकवण्यात आले होते. याची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल यांच्यासह अन्य पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. (Pune News) याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, पुण्यातील कॅम्प परिसरातही इस्रायलच्या राष्ट्रध्वजाचे स्टिकर्स रस्त्यावर लावण्यात आले होते. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : रुग्णालयात जाण्यासाठी ललित पाटील करत होता नाटक; २०२० मधील धक्कादायक व्हिडिओ समोर…
Pune News : वीज चोरी करणे पडले महागात ; महावितरणकडून २ कोटी ४५ लाख रुपयांची दंडात्मक कारवाई..
Pune News : पुणे-दौंड मार्गावर एका दिवसात १ हजार ३१७ फुकट्या प्रवाशांची जिरवली; ११ लाखांचा दंड वसूल