Pune News : पुणे : शहर आणि परिसरात अल्पवयीन मुले व मुलींवरील अत्याचारांच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. नुकताच एका पुण्यातील सहकारनगर परिसरातील एका शाळेमध्ये सात ते आठ मुलींवर अत्याचार होत असल्याची घटना उघड होत असतानाच, मुक्तांगण इंग्लिश मीडियम स्कूलमधील पहिलीतील विद्यार्थ्याला त्रास दिल्याप्रकरणी विद्यार्थ्यांविरुद्ध रॅगिंग कायद्यान्वये गु्न्हा दाखल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, विद्यार्थ्याच्या पालकांनी तक्रार दिल्यानंतर कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याने, संबंधित मुख्याध्यापिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रॅगिंग कायद्यान्वये गु्न्हा दाखल
याबाबत एका महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मुक्तांगण इंग्लिश मीडियम स्कूलमधील वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांसह, मुख्याध्यापिका अनुपमा गुजराती यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune News) तक्रारदार महिलेचा सहा वर्षांचा मुलगा मुक्तांगण इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पहिली इयत्तेत शिक्षण घेत आहे. दरम्यान, मागील दोन ते तीन दिवसांपासून शाळेतील वरच्या वर्गातील एक विद्यार्थी आणि त्याचे मित्र या मुलाला त्रास देत होते. चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होते.
या प्रकाराची माहिती दिल्यास जीवे मारू, अशी धमकी विद्यार्थ्यांनी दिली. त्यामुळे मुलगा घाबरला होता, असे तक्रारदार महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. याबाबतची माहिती मुख्याध्यापिका गुजराती यांना देण्यात आली. मात्र, त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. (Pune News) त्यामुळे मुलाची आई आणि अन्य पालकांनी सोमवारी शालेय प्रशासनाला जाब विचारला. मुलाच्या आईने याबाबत तक्रार दिल्यानंतर बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो), तसेच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संस्थांमध्ये रॅगिंग करण्यास मनाई अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला, असे दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी सांगितले.
या प्रकाराविषयी प्रतिक्रिया देताना पुणे विद्यार्थी गृहाचे कार्याध्यक्ष रेडकर म्हणाले की, शाळा व्यवस्थापन गैरप्रकारांना पाठीशी घालत नाही. (Pune News) येथे विद्यार्थ्यांचे हित, सुरक्षा आणि दर्जेदार शिक्षणास प्राधान्य दिले जाते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळेच्या आवारात सुमारे ८० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असून, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवून असतात. घटनेची चौकशी पूर्ण होईपर्यंत मुख्याध्यापिकांना निलंबित केले आहे.
पोलीस उपनिरीक्षक जाधव या घटनेच अधिक तपास करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : विजयादशमीच्या मुहूर्तावर शरद पवार घेणार पुण्यात सभा?
Pune News : चिमुकलीच्या तोंडावर लघुशंका करुन विनयभंग; नऱ्हेगावातील घटना
Pune News : रेल्वे सुरक्षा दलाच्या द्रोणा श्वानाची कमाल; पकडली ३२ किलो गांजाची तस्करी