Pune News | पुणे :अल्पवयीन मुलीला घरी बोलावत तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवून व्हिडिओ रेकॉर्डींग करत ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अनेकवेळा बलात्कार केल्याचा प्रकार पुण्यातील हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत घडला होता. त्याप्रकरणी एका समाजसेवकाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
शहरात शिक्षणाकरीता वसतीगृहात राहणाऱ्या मुलीबरोबर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा प्रकार एप्रिल २०१९ ते सप्टेबर २०२१ दरम्यान घडला.
याप्रकरणी एका २० वर्षीय तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून लॉरेन्स फ्रॅन्सिस अँथेनी (वय ५०, रा. शांताई टॉवर, चारवाडा, मांजरी) यास पोलीसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार अल्पवयीन मुलगी ही शिक्षण घेण्यासाठी आली आहे. दरम्यान तेथे वसतीगृहामध्ये काम करणारा लॉरेन्स अँथेनी याने फिर्यादी यांना ते पिंपरी चिंचवड येथे नवीन वसतीगृह चालू करणार आहे. त्या ठिकाणी इथल्या वसतीगृहापेक्षा चांगली सुविधा आम्ही देणार आहे. असे खोटे सांगत तक्रारदार मुलीला त्याच्या घरी घेऊन गेला.
सर्व प्रकार मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग…
त्यानंतर मुलीला त्याच्या घरातील कामे करायला लावली. दरम्यान एके दिवशी आरोपीची पत्नी व मुले घरी नसताना तक्रारदार मुलगी एकटी असताना तिच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले व हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग केला. त्यानंतर तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मुलीवर वारंवार बलात्कार केले. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!