Pune News पुणे : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याबाबत फेसबुक-यूट्यूबवर अश्लील कमेंट करण्यात आली होती. अशाप्रकारे कमेंट करणाऱ्या सात जणांविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची फिर्याद युवराज विलास चव्हाण (रा. धायरी) यांनी पुणे सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. (Pune News)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नाशिकच्या सभेवेळी खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या. त्या बोलत असताना 5 जणांकडून रुपाली चाकणकर यांच्याबाबत यूट्यूबवर अश्लील शब्दांचा वापर करत कमेंट केल्या. तसेच 6 जुलै रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेत रुपाली चाकणकर या फेसबुक लाईव्ह करत असताना दोघांनी आक्षेपार्ह कमेंट केल्या होत्या.
पुणे सायबर पोलिसांनी कारवाई
याबाबतची तक्रार युवराज चव्हाण यांनी केली. त्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी कारवाई करत सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, युवराज चव्हाण हे रुपाली चाकणकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात काम करतात. तसेच ते सोशल मीडियाचे कामकाज पाहतात.