Pune News : पुणे जिल्हा सत्र न्यायालयात चक्क महिलेला शिवीगाळ करुन मारहाण केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. हा प्रकार शिवाजीनगर न्यायालयातील पत्रावळे कोर्टाचे बाहेर असलेल्या वरंड्यामध्ये शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता घडला आहे. याप्रकरणी वकिलासह चौघांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pune News)
चौघांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गणेश पवार, नंदु पवार, अंजली मोरे आणि अॅड. सुनील कडसकर अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहे. याप्रकरणी एका २१ वर्षाच्या महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.(Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. फिर्यादी यांच्या घराच्याविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा चिखली पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली होती. त्यानुसार गुन्हा दखल करण्यात आला होता. या खटल्याच्या तारखेसाठी फिर्यादी या न्यायालयात आल्या होत्या.(Pune News)
दरम्यान, फिर्यादी कोर्टाच्या बाहेर असताना वकील सुनिल कडसकर व पती गणेश पवार याने फिर्यादी यांना केस मागे घे, म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच सासरे नंदु पवार याने फिर्यादीस अश्लिल शिवीगाळ केली.(Pune News)
तर नणंद अंजली मोरे हिने फिर्यादीचे केस ओढुन मारहाण केली. अशी फिर्याद महिलेनी पोलीस ठाण्यात दिली आहे.(Pune News)
याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अहिवळे करीत आहेत.