Pune News : पुणे : खडक परिसरात दहशत माजवणारा अट्टल गुन्हेगार आझम शेख याच्याविरुद्ध पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांची ही ४९ वी कारवाई आहे. गुन्हेगार आझम शेख याने खुनाचा प्रयत्न, खंडणी यासारखे गंभीर गुन्हे करुन दहशत माजवली होती.
शेख याच्यावर पाच वर्षांत ५ गंभीर गुन्हे दाखल
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आझम इक्बाल शेख (वय-२५, रा. भवानी पेठ, चुडामन तालीम समोर, पुणे) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. (Pune News ) आरोपीने खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न, खंडणी, सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला करणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, जीवघेण्या हत्यारांसह फिरणे, बेकायदा शस्त्र बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. शेख याच्यावर पाच वर्षांत ५ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
अट्टल गुन्हेगार असलेल्या या आरोपीविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता. (Pune News ) कागदपत्रांची शहानीशा करुन, पोलीस आयुक्तांनी आरोपीला एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत अमरावती मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल माने, पोलीस उपनिरीक्षक अतुल बनकर, व पी.सी.बी. गुन्हे शाखावरिष्ठ पोलीस निरीक्षक ए.टी. खोबरे, पोलीस उपनिरीक्षक राजु बहिरट यांनी केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : तमाशा व्यवसायात नफा मिळवून देण्याच्या आमिषाने साडेचार लाखांची फसवणूक
Pune News : स्पेअरपार्टची दुकाने असल्याचे भासवून ३५ लाखांची फसवणूक
Pune News : ऐन सणांत वीजदरवाढ, प्रति युनिट ‘इतके’ पैसे द्यावे लागणार..