Pune News : पुणे : गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होते. या काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. शहरात हजारो सीसीटीव्ही भाविकांवर लक्ष ठेवण्यासाठी लावण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील तीन गुंडांनाही तडीपार करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिले आहेत.
पुणे शहर, जिल्ह्यातून केले तडीपार
अधिक माहितीनुसार, सागर श्रावण पवार-पाटोळे (वय २८, वारजे), प्रथम उर्फ मनोज विनोद ससाणे (वय २०, रा भवानी पेठ), गणेश अरुण गायकवाड (वय २४, रा. शंकरमहाराज वसाहत, धनकवडी) अशी तडीपार करण्यात आलेल्या गुंडांची नावे आहेत. (Pune News) स्वारगेट आणि सहकारनगर पोलिसांनी तिघांना शहरातून तडीपार करण्याचा प्रस्ताव परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्याकडे पाठविला होता.
तडीपार गुंडांविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, बेकायदा शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. प्रस्तावाची पडताळणी केल्यानंतर पोलीस उपायुक्त पाटील यांनी तिघांना पुणे शहर, जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश दिले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : रोड रोमिओच्या जाचाला कंटाळून अल्पवयीन मुलीने संपवले जीवन