Pune News : पुणे : प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या पोषण आहार योजनेतील तांदळाची परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणीनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सिंहगड पोलिसठाण्यात गुन्हा दाखल
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, अजिनाथ सदाशिव सानप (वय ४१, रा. सरनौबतवाडी, कोल्हापूर), रामराज उर्फ रामभाऊ मोताीराम गोयेकर (वय ३०, रा. काळेपडळ, हडपसर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींचे नाव आहे. (Pune News) याबाबत संतोष रामदास फाटके (वय ३०, रा. मांजरी) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धायरी भागात संस्कार महिला मंडळाचे स्वयंपाकघर आहे. प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. शासकीय योजनेतील ८ लाख ९६ हजार २०० रुपयांचा तांदूळ सानप आणि गोयेकर यांच्याकडे देण्यात आला होता. (Pune News) दोघेही शासकीय योजनेतील तांदूळ खुल्या बाजारात विक्री करण्यासाठी टेम्पोतून घेऊन निघाले होते.
दरम्यान, तांदूळ विक्रीला नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर दोघांना सापळा लावून पकडण्यात आले. (Pune News) दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हे शाखेच्या युनिट एकचे सहाय्यक निरीक्षक आशिष कवठेकर या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : काकूला धमकावून पुतण्याने केला बलात्कार; पैसेही उकळले; गुन्हा दाखल
Pune News : पुण्यातील रिक्षाचालक संघटनेकडून बंदची हाक; ५० ते ६० हजार रिक्षाचालक संपात सहभागी होणार..