Pune News : एका पोलीस अकादमीमध्ये एकत्र शिकत असताना एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात मुलीने तक्रार दिली आहे. हा सगळा प्रकार सप्टेंबर २०२२ ते आता पर्यंत सुरू होता. पोलिसांनी या घटनेची दखल घेत आरोपीला ताब्यात घेतले आहे.(Pune News)
पोलिसांनी या घटनेची दखल घेत आरोपीला ताब्यात घेतले आहे.
तानाजी ब्रम्हा कांबळे (वय -३५ रा. मूळ गाव कुतुर. ता आजरा जिल्हा कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तानाजी ब्रम्हा कांबळे आणि फिर्यादी मुलगी हे एका पोलीस अकादमीत ट्रेनिंगला एकत्र होते. तिथे त्यांची ओळख झाली. तिथे त्याने फिर्यादीसोबत प्रेम संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर फिर्यादी मुलीच्या इच्छेविरोधात तीन ते चार वेळा लॉजवर घेऊन गेला. त्याठिकाणी अश्लील विडिओ दाखवत शारीरिक संबंध केले. त्यानंतर पीडित मुलीला गर्भनिरोधक गोळी खायला दिली.(Pune News)
दरम्याण, याबाबत कोणाला काही सांगायचं नाही म्हणून धमकी देवून आरोपीने संबंध असेच सुरू ठेवण्यासाठी सांगितले. या प्रकराच्या विरोधात पीडित मुलीने तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार आरोपी कांबळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबतच अधिक तपास सहकारनगर चे पोलीस उपनिरीक्षक राजगुरू करत आहे.