Pune News : जेजुरी येथील धालेवाडी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक मेहबूब सय्यदलाल पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील २ आरोपींना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने डेक्कनमधून अटक केली आहे. आत्तापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या ४ झाली आहे. तर एक आरोपी फरार असून त्याचे नाव अद्याप स्पष्ट झालेले नाही.(Pune News)
अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या ४ झाली आहे.
वनीस प्रल्हाद परदेशी (रा. ४०४, गुरुवार पेठ, पुणे) आणि महादेव विठठल गुरव ऊर्फ काका परदेशी वय ६५ वर्षे, रा. ढालेवाडी, बेंद वस्ती, जेजुरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर यापूर्वी पोलिसांनी महिला आरोपी किरण वणेश परदेशी (वय–३८) आणि मुलगा स्वामी वणेश परदेशी (वय-१९) ( दोघेही रा. जेजुरी, ता. पुरंदर) यांना अटक केली होती. त्या दोन्ही आरोपींना सासवड न्यायालयात हजर केले असता न्यायालयांना दोघांना ११ जुलैपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.(Pune News)
पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहबूब पानसरे यांच्याबरोबर जमिनीच्या वादातून आरोपी वणेश प्रल्हाद परदेशी, महिला आरोपी किरण वणेश परदेशी, स्वामी वणेश परदेशी, काका परदेशी आणि एक लाल शर्ट घातलेला अनोळखी इसम यांनी बाचाबाची सुरू केली.(Pune News)
यातच आरोपी वणेश याने मेहबूबभाई पानसरे यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. हल्ल्यात जखमी झालेल्या मेहबूबभाई पानसरे यांना जेजुरीतील खासगी रुग्णालयात तेथून पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, उपचारादरम्यान पानसरे यांचा मृत्यू झाला होता.(Pune News)
मेहबूब पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील दोन आरोपी दोन्ही आरोपी डेक्कन परिसरात येणार आहेत, अशी गोपनीय माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून वनीस परदेशी आणि महादेव विठठल गुरव ऊर्फ काका परदेशी या दोघांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.(Pune News)
दरम्यान, आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, आरोपींनी वरील गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे. दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी जेजुरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर एक अनोळखी आरोपी फरार असून त्याचे अद्याप नाव समोर आले नाही. पोलीस त्यादृष्टीने पुढील तपास करीत आहेत.(Pune News)
हि कारवाई पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनानुसार खंडणी विरोधी पथक- २, गुन्हेशाखा, पुणे शहर कडील वरिष्ठ निरीक्षक प्रताप मानकर, पोलीस उप निरीक्षक मोहनदास जाधव, (Pune News) पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे, ईश्वर आंधळे, सचिन अहिवळे, शंकर संपते, सैदोबा भोजराव, चेतन अपाटे, प्रदिप गाडे, पवन भोसले यांच्या पथकाने केली आहे.(Pune News)