Pune News : पुणे : ड्रग्स तस्कर ललित पाटील याला अटक झाल्यानंतर अनेक गोष्टींचा खुलासा होत आहे. ललित पाटील याचा २०२० मधील एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये रुग्णालयात दाखल होण्यासाठी ललित पाटीलने केलेले नाटक स्पष्टपणे दिसत आहे. यामुळे त्याला मदत करणाऱ्या सर्वांच्या अडचणीत वाढ होणार हे निश्चित आहे.
पोलीस तसेच काही राजकीय नेत्यांनाही केले होते मॅनेज?
ललित पाटील ससून रूग्णालयातील डाॅक्टरना मॅनेज करून, त्यांच्याकडून आजारपणाचे खोटे प्रमाणपत्र मिळवून ससूनमधील मुक्काम वाढवत असल्याची खळबळजनक माहिती यापूर्वीच उघड झाली आहे. त्यानंतर आता तो करत असलेल्या आजारपणाच्या नाटकाचा व्हिडीओ समोर आला आहे. (Pune News) रुग्णालयात राहून सर्व सुविधा तो मिळवत होता. रुग्णालयातूनच हॉटेलमध्ये रुमचे बुकींग त्याने करुन ठेवले होते. अनेकदा त्याच्या मैत्रिणी तेथे त्याला भेटण्यासाठी येत होत्या. एवढेच नव्हे तर ससुनमधील सुरक्षेसाठी असणारे पोलीस तसेच काही राजकीय नेत्यांनाही त्याने मॅनेज केल्याची माहिती मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर ललित पाटील याचा आजारपणाचा नाटक करत असतानाचा २०२० मधील व्हिडिओ समोर आला आहे. हिंजवडी पोलिसांनी त्यावेळी ललित पाटील याला अटक केली होती. ठाणे येथील एका ड्रग्स तस्करी प्रकरणात ललित पाटील याला अटक करण्यात आली होती. (Pune News) त्यानंतर त्याला तपासणीसाठी रुग्णालयात आणले. तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. हिंजवडी पोलीस ठाण्यात ललित पाटील याला आणल्यावर तो जिन्यावरुन चालत असल्याचे दिसत आहे. तो यामध्ये आजारपणाचे नाटक करत आहे. जिन्यावरून उतरत असताना पडल्याचे त्या व्हिडिओत दिसत आहे. त्यानंतर त्याला औंध रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, ललित पाटील याच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत असल्याने, पोलीस कोठडी पुन्हा वाढवून मागण्यात येणार आहे. अंधेरी न्यायालयात त्याला हजर करण्यात येणार आहे. या वेळी त्याच्या चौकशीतून अजून काही खुलासे समोर येण्याची शक्यता आहे. (Pune News) मुंबई पोलिसांनी ललित पाटील याला नाशिकला नेऊन तपास केला होता. ललित पाटील याला ड्रग्स बनवण्याचा फार्मूला देणाऱ्या अरविंद लोहारे याला २५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. तसेच भूषण पाटील आणि बालकवडे या दोघांना एका दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : वीज चोरी करणे पडले महागात ; महावितरणकडून २ कोटी ४५ लाख रुपयांची दंडात्मक कारवाई..
Pune News : पुणे-दौंड मार्गावर एका दिवसात १ हजार ३१७ फुकट्या प्रवाशांची जिरवली; ११ लाखांचा दंड वसूल