Pune News : पुणे : शहर आणि परिसरात घरफोडींच्या प्रमाणात वाढ होत आहे. बंद सदनिकांचे कुलूप तोडून ऐवज लंपास करणाऱ्या मध्य प्रदेशातील चोरट्यांच्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले. चोरट्यांकडून तब्बल आठ लाख ८४ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
आठ लाख ८४ हजार रुपयांचा ऐवज जप्त
दरम्यान, या चोरट्यांकडे अधिक तपास केला असता, घरफोडीचे सात गुन्हे उघडकीस आले आहेत. मुकेश ग्यानसिंग भुरीया (वय २७), सुनिल कमलसिंह अलावा (वय २८), हरसिंह वालिसिंह ओसणीया (वय २२), सुंदरसिंह भयाणिंसह भुरिया (वय २५,सर्व रा. धार, मध्यप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या भामट्यांची नावे आहेत.
याप्रकरणी खडकी, येरवडा, विश्रांतवाडी, कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. (Pune News) मध्य प्रदेशातील चोरट्यांची टोळी खडकीतील रेंजहिल्स परिसरात थांबल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट चारला मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून चोरट्यांना गजाआड केले.
संबंधित चोरटे घरफोडीचे गुन्हे करण्यासाठी मध्यप्रदेशातून पुण्यात आले होते. चोरट्यांची टोळी मध्यरात्री सोसायटीच्या आवारात शिरायची. (Pune News) बंद सदनिकांची पाहणी करुन कटावणीने कुलूप तोडायचे आणि ऐवज लांबवायचे.
अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक निरीक्षक विकास जाधव, उपनिरीक्षक जयदीप पाटील आणि पथकाने ही कारवाई केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : दर्शनी भागात ओळखपत्र न लावणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई
Pune News : अल्पवयीन मुलीला पॉर्न व्हिडिओ दाखवून लैंगिक शोषण
Pune News : प्राईड हॉटेलच्या जलतरण तलावात बुडून प्राध्यापकाचा मृत्यू; सहा महिन्यांनंतर घटना उघड