Pune News : पुणे: उच्च शिक्षीत आणि एका आयटी कंपनीमध्ये नोकरी करणाऱ्या माथेफिरूने तो रहात असलेल्या सोसायटीच्या पार्कींग मधील दुचाकीला व तेथेच असलेल्या एका फ्लॅटला आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Highly qualified person set fire to the car)
याप्रकरणी सांगवी पोलिसांनी निवेश सुरेश केलप्पन (वय 35 रा.पिंपळे गुरव) याला अटक केली असून महिलेने याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हा प्रकार रविवारी (ता. 11) पिंपळे गुरव येथील करण रेसीडेन्सी येथे पहाटे पावणे चारच्या सुमारास घडला.
तब्बल 4 लाख 30 हजार रुपयांचे नुकसान
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने काहीही कारण नसताना पहाटे सोसायटीच्या पार्किंगमध्ये जात लायटरच्या सहाय्याने कपडा पेटवला तसेच त्याने एका दुचाकीला आग लावली. (Pune News) ही आग एवढी वाढली की पुढे सोसायटीच्या एका फ्लॅटमध्ये याच्या झळा पोहचून फ्लॅटमध्ये ही आग लागली.
सुदैवाने यात कोणती ही जिवीत हानी झालेली नाही.मात्र पार्किंगच्या काही दुचाकी व एका चाराचाकीला ही आग लागली होती. यामध्ये तब्बल 4 लाख 30 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी सोसायटीमध्ये चौकशी केली असता त्याचे कोणाशी ही भांडण नव्हते, त्याच्यावर या आधी कधी कोणता गुन्हा देखील दाखल नाही, तरी त्याने असा विक्षीप्तपणा का केला याचा सांगवी पोलीस करत आहेत.(Pune News) त्याच्यावर परिसरात दहशत पसरवणे, मालमत्तेचे नुकसान व सदोष मनुष्य वध करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : खंडणीसाठी वित्तीय संस्थेतील व्यवस्थापकाचे अपहरण करणाऱ्यांना ठोकल्या बेड्या…