Pune News: पुणे : मध्यस्थाने घेतलेले पैसे परत न दिल्याच्या रागातून चौघांनी आपल्याच मित्रांचे अपहरण करून लॉजमध्ये डांबून त्याला मारहाण केल्याची घटना घटना उघडकीस आली आहे. ‘अडीच लाख घेऊन आलात ; तरच तुमचा मुलगा वाचेल. अन्यथा त्याला मारून टाकू,’ अशी धमकी तरुणाच्या वडिलांना देण्यात आली. गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने तरुणाची सुटका करून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अभिजित राजेंद्र थोरात (वय २०, रा. कर्जत) आणि निखिल रमेश कांबळे (वय ३१, रा. दत्तनगर, कात्रज) यांना अटक करण्यात आली आहे. प्रथमेश पाटील (वय २२, रा. पंढरपूर) याच्यासह अल्पवयीन मुलगा आणि साथीदारांवर सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune News) याबाबत धुळे येथील तरुणाने तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोकरी लागल्याबाबत माहिती त्याने सोशल मीडियावर प्रसारित केली. हे पाहून अभिजित थोरात याने तरुणाशी संपर्क साधला. नोकरी कशी मिळाली, हे विचारून त्याने मध्यस्थ सिंग याचा संपर्क क्रमांक मागितला. (Pune News) थोरात आणि त्याच्या साथीदारांनी सिंग याच्याशी संपर्क साधून त्याला नोकरीसाठी पैसे दिले. मात्र, त्यांना नोकरी मिळाली नाही. यामुळे ते चिडले. तरुण धुळे येथे जात असताना निखिल कांबळे आणि त्याच्या साथीदारांनी संपर्क करून त्याला पनवेल कळंबोली येथे गाठले. अभिजित थोरात याला भेटण्याच्या बहाण्याने ते त्याला पुण्यात धनकवडी येथील एका लॉजवर घेऊन आले आणि तेथे डांबून ठेवले.
‘तुझ्यामुळे आमचे पैसे सिंगकडे अडकले आहेत,’ असे म्हणून आरोपींनी तरुणाला शिवीगाळ केली. ‘मला हा प्रकार माहीत नाही,’ असे तरुणाने सांगितले. तरीही आरोपींनी त्याला मारहाण केली. तरुणाच्या वडिलांना फोन करून अडीच लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. (Pune News) खंडणी न दिल्यास मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. चेक आणि ‘फोन-पे’द्वारे आरोपींनी तरुणाच्या बँक खात्यातून ९० हजार रुपये काढून घेतले.
दरम्यान, आरोपी बाहेर गेल्याने संधीचा फायदा घेऊ तरुणाने आपल्या मोबाइलवरून वडिलांना व्हॉटस्अॅपद्वारे लोकेशन पाठवले. (Pune News) त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिस त्वरित घटनास्थळी दाखल झाले आणि तरुणाची सुटका केली. पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, प्रताप मानकर, सहाय्यक निरीक्षक अभिजित पाटील, अंमलदार सचिन अहिवळे, प्रवीण ढमाळ, सुरेंद्र जगदाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांसह पुणे शहर विद्यार्थी काँग्रेसचे आंदोलन
Pune News : पुणे जिल्ह्यात यलो अलर्ट जारी! पर्यटकांनी काळजी घ्यावी – हवामान खात्याकडून आवाहन
Pune News : चार वर्षाची चिमुकली शाळेत जाताना स्कूल बसमध्ये झोपली अन् तब्बल ३ तास बसमध्ये अडकली