Pune News : पुणे : महापालिकेत सफाई कामगार म्हणून काम करत असलेल्या विधवा महिलेच्या असहायतेचा गैरफायदा उठवून तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली, एवढ्यावरच न थांबता, पुणे महापालिकेच्या आरोग्य निरीक्षक ठेकेदारासह तिघांनी तिला जातीवाचक शिवीगाळ केली. याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार महापालिकेच्या आरोग्य निरीक्षक ठेकेदारासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य निरीक्षक मंगलदास माने, ठेकेदार शिवाजी सुळ आणि संजय वाघमारे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत बिबवेवाडीतील एका ४० वर्षांच्या महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune News) फिर्यादी महिला महापालिकेत सफाई कामगार म्हणून काम करतात. त्या असहाय व विधवा असल्याची माहिती मंगलदास माने याला होती. मात्र, एका विधवा महिलेच्या असाह्यतेचा गैरफायदा उठवत त्याने तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करुन, तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
माने याने संबंधित महिलेकडे पैशांची मागणी केली. त्या सुट्टीवरुन १० एप्रिल रोजी परत आल्यावर हजर होण्याची चिठ्ठी घेण्यासाठी ठेकेदार शिवाजी सुळ याच्याकडे गेल्या होत्या. (Pune News) त्यावेळी त्याने फिर्यादी यांना ‘तू माने साहेबांकडे जा, तेच याबाबत निर्णय घेतील. तुम्ही जातीवरच जाणार’, असे बोलून जातीवाचक शिवीगाळ केली.
याप्रकरणी महिनेले या दोघांविरुद्ध तक्रार अर्ज दाखल केला होता. हा अर्ज मागे घेण्यासाठी संजय वाघमारे याने धमकी दिली. पोलिसांनी अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (Pune News) सहायक पोलीस आयुक्त शिरगावकर या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुणे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत भास्कर शिवले प्रथम..
Pune News : आमदार तापकीर म्हणाले, ‘घरावर पाटी लावण्यासाठी सरपंच होऊ नका, तर…’