Pune news : पुणे : पुण्यातील नामांकित एआरव्ही गोयल बिल्डर यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून कोट्यवधी रुपयांची खंडणी मागणाऱ्या मासाळ कुटूंबियांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बिल्डरला खोट्या गुन्ह्यात अडकवणाऱ्या आरोपींना अद्दल घडल्याबद्दल शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले.
कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
बनावट कागदपत्रांचा वापर करून, तब्बल १५ कोटींची खंडणी वसूल करण्यासाठी पुण्यातील नामांकित गोयल बिल्डर यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात आले होते. (Pune news) गोयल यांच्याविरुद्ध कट रचून, बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या सूत्रधाराचा पोलीस तपास करत होते. याप्रकरणी फिर्यादी राहुल प्रेमप्रकाश गोयल यांच्या तक्रारीवरून कुणाल शंकर मासाळ, अनिता शंकर मासाळ, चैताली शंकर मासाळ, तेजस शंकर मासाळ यांच्या विरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोयल बिल्डर यांचे मोठ्या प्रमाणावर बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. पिसोळी येथील एका प्रकल्पात बांधकाम व्यावसायिक राहुल गोयल व मासाळ कुटूंबिय यांच्यात करार झाला होता. दरम्यान, पिसोळी येथील जमिनीचे भाव वधारल्याने, मासाळ कुटूंबाला जास्त पैशांचा मोह झाली. त्यांना करारनाम्यावरून ठरवलेला मोबदला कमी वाटू लागल्याने त्यांनी शक्कल लढवली.
मासाळ कुटूंबाने खोट्या कागदपत्रांच्या आधारे बिल्डर विरोधात खंडणी स्वरूपात १५ कोटी रुपये रक्कम मागण्यास सुरुवात केली. (Pune news) याच दरम्यान पडद्यामागील सुत्रधाराने मासाळ यांच्या माध्यमातून कोर्टापुढे बनावट कागदपत्रे सादर करून, कोर्टाची दिशाभूल करत गोयल यांच्याविरुद्ध फसवणूकीचा दाखल केला. दरम्यान, झालेल्या अन्यायाविरुद्ध राहुल गोयल यांनी न्यायालयात धाव घेत दाद मागितली होती.
दरम्यान, न्यायालयाने कागदपत्रांचे अवलोकन करून, आरोपींविरुद्ध खंडणी व बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.(Pune news) या घटनेमागील मास्टर माईंड कोण? याचा शोध घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : शीतपेयात गुंगीचे ओैषध मिसळून, महिलेवर बलात्कार