Pune News : पुणे शहरात गुन्हेगारीबरोबरच अंमली पदार्थांची विक्री वाढत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून होत असलेल्या गुन्हेगारी कारवायांमुळे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. मागील सहा महिन्यांत सात कोटींपेक्षा जास्त किंमतीचे ड्रग्स पुणे पोलिसांनी जप्त केले आहेत. अंमली पदार्थांना विशिष्ट इमोजीचे कोडवर्ड तस्कारांनी दिल्याची धक्कादायक माहिती पुणे पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. यासंदर्भात ट्विट करत पोलिसांनी माहिती दिली आहे.(Pune News)
गुन्हेगारी कारवायांमुळे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.
पुणे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कधी गुन्हेगारी टोळ्या वाहनांची तोडफोड करत आहेत, कधी कोयता गँगचा धुमाकूळ सुरू असतो, तर कधी तरूणींवर दिवसाढवळ्या हल्ला होतो.(Pune News) या सर्व प्रकारानंतर पुणे शहरात अंमली पदार्थांचा विक्री वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. पुणे शहर पोलिसांनी मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त केले आहेत.(Pune News)
दरम्यान, गेल्या सहा महिन्यांत पोलिसांनी ८२ डिलरकडून तब्बल ७.२८ कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त केले आहेत. याप्रकरणी आरोपींनाही पोलिसांनी अटक केली. पुणे शहर अंमली पदार्थांचे हॉटस्पॉट ठरत असल्याचे आता समोर येऊ लागले आहे. (Pune News) अंमली पदार्थ विकत घेण्यासाठी आता चक्क इमोजी कोडवर्डचा वापर होत आहे. ड्रग्स विकत देणारे अन् घेणारे पोलिसांना चकवण्यासाठी कोडवर्ड वापरत आहेत. इमोजीच्या कोडवर्डमधून ते संवाद साधत व्यवहार पूर्ण करत आहेत.
असा होतो ईमोजींचा वापर
– गांजा ????????
– कोकेन ????????
– MDMA ????
– मशरूम ????
– हेरॉईन ????
तस्कर इमोजीचा वापर करुन अंमली पदार्थांची विक्री करत आहेत. पोलिसांच्या रडारवर ते आहेत. त्यांना लवकरच अटक केली जाणार आहे. परंतु पालक अन् मुलांनीही सावध राहवे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे(Pune News)