Pune News : पुणे : पुणे शहर आणि परिसरात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागली आहे. झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) बिबवेवाडी भागात दहशत माजविणाऱ्या गुंडाविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले. सनी संतोष भरगुडे (वय २४, रा. बिबवेवाडी) असे कारवाई केलेल्या गुंडाचे नाव आहे. या गुंडाला वर्षभरासाठी अमरावती कारागृहात स्थानबद्ध करण्यात येणार आहे.
वर्षभरासाठी अमरावती कारागृहात स्थानबद्ध
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी भरगुडे याच्याविरुद्ध बिबवेवाडी, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण, बेकायदा शस्त्र बाळगणे, (v) बाल लैंगिक अत्याचार, तसेच दरोड्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झालेले आहेत.
बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सविता ढमढेरे, गुन्हे प्रतिबंधक शाखेचे पोलीस निरीक्षक ए. टी. खोबरे यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये भरगुडे याच्याविरुद्ध कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी (Pune News) प्रस्तावास मंजुरी देऊन भरगुडे याला वर्षभरासाठी अमरावती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुण्यात आठ महिन्यांत १४ हजार ७२ नागरिकांना श्वानदंश