Pune News : पुणे : मुलीच्या नावावर जमीन करुन देण्यासाठी सासरे व त्याच्या नातेवाईकांनी जावयाचे अपहरण करुन चक्क गोठ्यामध्ये हातपाय बांधून डांबून ठेवल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल
याप्रकरणी पोलिसांनी सासरे प्रकाश गेमा राठोड, चलुत सासरे रमेश गेमा राठोड व इतर नातवाईक मंगेश वडते, योगेश वडते, दादासाहेब राठोड, अशोम गेता राठोड (सर्व रा. शाहुनगर, पिंपळा गेवराई, जि. बीड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. विनोद साहेबराव आडे (वय २५, रा. रामनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आडे यांनी त्यांची पत्नीचे नावावर जमीन करावी, अशी त्यांच्या सासर्यांची मागणी होती. मात्र, त्याला फिर्यादी यांनी नकार दिला होता. या कारणावरुन सासर्यांनी इतर नातेवाईकांच्या मदतीने ४ सप्टेबर रोजी फिर्यादी यांचे तोंड दाबून स्कॉपियोमध्ये बसविले. त्यांना बीडमध्ये नेले.
दरम्यान, तेथे गेल्यावर गोठ्यामध्ये दोरीने हातपाय बांधून डांबून ठेवले. फिर्यादींना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पत्नी आर्तिका हिच्या नावावर जमीन कर नाही तर तुला मारुन टाकेल, अशी धमकी दिली. ६ सप्टेबर रोजी फिर्यादी यांची सुटका झाल्यानंतर त्यांनी पुण्यात येऊन फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक होले तपास करीत आहेत.