Pune News : पुणे : पुण्यातील एका इम्पोर्ट एक्स्पोर्टचा व्यवसाय असलेल्या व्यावसायिकाला बनावट ई-मेल चा वापर करून गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. (A businessman in Pune found it costly to trust fake emails)
याप्रकरणी कुमार कोंडीबा शिनगारे यांनी फिर्यादी दिली आहे. शिनगारे हे इम्पोर्ट एक्स्पोर्टचा व्यवसाय करत असून स्विर्त्झलँड येथील एका कंपनीबरोबर अनेक व्यावसायिक व्यवहार झाले आहेत. ते कंपनीच्या मेलवरून संवाद साधून सामानाची खरेदी करायचे.
बनावट ई मेलद्वारे २७ लाखांचा गंडा
स्विर्त्झलँड येथील कोटा संपलेला असून चीनमधून एक मशीन इम्पोर्ट करायचे आहे. (Pune News) सदर मशीनची किंमत ६७ हजार ९०० डॉलर आहे. त्यासाठी ५० टक्के रक्कम आधी करायचे आहे. असा मजकूरचा शिनगारे यांना ई-मेल आला.
कॉन्ट्रॅक्टमध्ये सांगितल्याप्रमाणे शिनगारे यांनी ५० टक्के रक्कम सांगितलेल्या बँक खात्यावर पाठवले. त्यांनतर मशीन पाठ्वण्याबाबत वेळोवेळी ई-मेल द्वारे विचारणा करत असताना कंपनीच्या शिक्क्याचे लेटर पाठवत शिपिंग एजंटला कॉन्ट्रॅक्टप्रमाणे उर्वरित रक्कम पाठवण्यास सांगितले. ((Pune News)) शिनगारे यांना संशय आल्याने कंपनीच्या अधिकाऱ्याला विचारणा केली तेव्हा असा कोणताही ई-मेल आमच्या कंपनीने पाठवला नसल्याचे सांगितले. तेव्हा ई-मेल आयडी पुन्हा तपासून पहिला असता मुख्य कंपनीच्या ई-मेल आयडीशी मिळता जुळता ई-मेल आयडी असल्याचे लक्षात आल्याने फसवणूक झाल्याचे शिनगारे यांच्या लक्षात आले.
याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कुमार घाडगे हे करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : मुंढव्यात पबमध्ये प्रवेश नाकारल्याच्या रागातून वेटरवर धारदार शस्त्राने वार
Pune News : मोदी सरकार म्हणजे ‘नो डेटा अव्हेलेबल; काँग्रेसच्या नेत्या अनुमा आचार्य यांची टीका