Pune News पुणे : भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात टेम्पोच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील आरोपी घटनास्थळी न थांबताच पळून गेला होता. (Pune News) पण केवळ आरशावरील रेडियम आणि वाहनाच्या मागे असलेले रिबीन यावरूनच पोलीस हवालदाराने आरोपीचा शोध घेत त्याला पकडले. (Pune News)
कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 22 एप्रिल रोजी कात्रज-कोंढवा रोडवर ही घटना घडली होती. गणेश तुळशीराम काळभोर ही 45 वर्षीय व्यक्ती दुचाकीवरुन घरी जात असताना कोंढवा-कात्रज रोडवरील मोहन मार्बल्ससमोर भरधाव वेगात जाणाऱ्या एका टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या गणेश काळभोर यांचा जागीच मृत्यू झाला. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार दिनेश रासकर यांच्याकडे देण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास करत असताना रासकर यांनी परिसरातील 100 ते 150 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. तसेच परिसरातील अनेक ट्रान्सपोर्ट कार्यालयात जाऊन चौकशी केली. परंतु, आरोपीचा शोध लागत नव्हता. पण केवळ आरशावरील रेडियम आणि रिबीनवरून दिनेश रासकर यांनी तपास केला. यामध्ये आरोपीला अटक करून गुन्हा उघडकीस आणला.
ग्रामस्थांच्या वतीने सत्कार
या विशेष अशा कामगिरीमुळे पोलीस हवालदार दिनेश रासरक यांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.