Pune News : पुणे: तलवारीचा धाक दाखवित चिंचोली मोराची (ता. शिरूर) येथील दलित वस्तीवर महिला सरपंच व त्यांच्या पतीसह कुटूंबियांना मारहाण केल्याची धक्कादायक समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. या भागात तणावपूर्ण शांतता आहे. गुरूवारी (ता. १) सायंकाळी घडलेल्या या प्रकारानंतर चिंचोलीच्या दलित वस्तीत भितीचे वातावरण असून, याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. (Shocking! Come to the village to apologize or we will cut you with a sword….)
अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा दाखल
या प्रकरणी चिंचोलीच्या उपसरपंच व प्रभारी सरपंच अश्विनी विजय मोहिते यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्यानुसार महेश कैलास नाणेकर, निखिल धैर्यशील नाणेकर, धैर्यशील शिवाजी नाणेकर, सुनिता राहुल नाणेकर, सविता धैर्यशील नाणेकर यांच्यासह तिघांविरूद्ध, बेकायदा जमाव जमवून दलित वस्तीवर हल्ला व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. (Pune News ) त्यांच्यापौकी दोघांना अटक केली असल्याची माहिती शिरूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक जून रोजी दुपारी दोनच्या सुमारास सविता नाणेकर, सुनिता नाणेकर, महेश नाणेकर, निखिल नाणेकर, धैर्यशील नाणेकर यांच्यासह तिघांनी मोहिते वास्तव्यास असलेल्या दलितवस्तीत येऊन वैशाली मोहिते यांना मारहाण केली. (Pune News ) स्टंप, तलवारीचा धाक दाखविला. सरपंच मोहिते, त्यांचे पती विजय मोहिते, कांताबाई मोहिते यांना मारहाण केली. राहुल नाणेकर यांची माफी मागायला गावात चला नाहीतर तलवारीने तुमचे तुकडे करू, अशी धमकीही हल्लेखोरांनी दिली. या प्रकाराला पाच दिवस उलटल्यानंतरही चिंचोलीच्या दलित वस्तीत भितीचे वातावरण आहे.
चिंचोलीचे यापूर्वीचे उपसरपंच राहुल नाणेकर यांनी राजीनामा दिल्यानंतर दहा ऑक्टोबर २०२२ पासून अश्विनी मोहिते या उपसरपंचपदावर आल्या.(Pune News ) एप्रिल २०२३ ला सरपंच अशोक गोरडे यांनी राजीनामा दिल्याने सरपंचपदाचा प्रभारी पदभारही त्यांच्याकडे होता. या दरम्यान, ३१ मे रोजी झालेल्या चिंचोली च्या ग्रामसभेत मोहिते यांच्या जाऊ वैशाली मोहिते यांना राहुल नाणेकर याने धक्का दिल्याने वाद झाला. तथापि, ग्रामसभेला उपस्थितांनी हा वाद मिटविला.
मात्र, ग्रामसभेनंतरही राहुल नाणेकर, दशरथ पडवळ व अण्णा साळे हे ग्रामपंचायतीबाहेर गोंधळ घालत होते. त्यावेळी त्यांनी वैशाली मोहिते यांच्यासोबत पुन्हा वाद घातला असता वैशाली मोहिते यांनी तिघांच्याही कानाखाली दिली. (Pune News ) हा वाद वाढू नये म्हणून सरपंच मोहिते यांनी या वादात मध्यस्थी करून वैशाली मोहिते यांना तिघांचीही माफी मागायला लावून त्या घरी गेल्या.