पुणे : पुणे-लोणावळा रेल्वेत टीसीला एका अल्पवयीन मुलाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी टीसीने रेल्वे पोलिसांत तक्रार दिली असून आरोपीला अटक केली आहे.
गणेश जाधव असे टीसीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून आरोपी हा अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टीसी गणेश जाधव हे पुणे-लोणावळा रेल्वेत टीसी म्हणून काम करतात. रविवारी पुणे-लोणावळा रेल्वेत जाधव हे आपलं कर्तव्य बजावत असताना पुण्याहून लोणावळ्यकडे जाणाऱ्या रेल्वेत एका बोगीतून दुसऱ्या बोगीत जात असताना त्यांनी वाटेत उभ्या असलेल्या आरोपी मुलाला बाजूला हो पुढे जायचं आहे असे म्हटले. त्यामुळे मुलाने थेट जाधव यांच्या डोळ्यावर बुक्क्यांचा मारा केला.
दरम्यान, मार इतका जबदस्त होता की, टीसी जाधव यांच्या डोळ्यातून रक्त वाहू लागले. त्यानंतर गणेश जाधव ह्यांनी आरोपीला पकडून ठेवत प्रवाशांच्या मदतीने रेल्वे पोलसांच्या ताब्यात देण्यात आले.