Pune Fraud News | पुणे : पुण्यातील कॅम्प परिसरातील उच्चभ्रू इमारतीत रेस्टॉरंट विकत घेण्याच्या बहाण्याने एका बांधकाम व्यावसायिकाची तब्बल साडेपाच कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार 21 सप्टेंबर 2021 ते मे 2023 दरम्यान घडला.
सुशील घनश्याम अग्रवाल (रा. लुल्लानगर) आणि अल्नेश अकील सोमजी (रा. बोट क्लब रोड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत प्रसाद यशवंत भिमाले (वय 41, रा. गुरुवार पेठ) यांनी आरोपींविरोधात पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार प्रसाद भिमाले हे बांधकाम व्यावसायिक असून, ते आणि त्यांचा पुतण्या यांनी कॅम्प परिसरात बीएमडब्ल्यू शोरूमच्या वर गगन आयलँड टाऊनशिप या ठिकाणी रेस्टॉरंट विकत घेण्यासाठी आरोपींसोबत बोलणे केले होते.
मात्र, सुशील अग्रवाल आणि अल्नेश सोमजी यांनी रेस्टॉरंट विकत देतो, असे सांगितल्याने विश्वास ठेवून संबंधित प्रोजेक्टकरिता तक्रारदार यांनी दोन कोटी 62 लाख रुपये आरोपींच्या फार्मच्या खात्यावर पाठविले. याबाबत आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक एस. शेळके पुढील तपास करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Breaking News : महाराष्ट्र सत्तासंघर्ष ! शिंदे गटाला मोठा धक्का ; भरत गोगावलेंची नियुक्ती बेकायदेशीर