Wednesday, May 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Drug Racket Busted : लोणीकंद पोलिसांचा ‘ड्रग्जवर सर्जिकल स्ट्राईक’! एमडी ड्रग्ज विक्री करणारे ६ आरोपी जेरबंद; ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 30 April 2026, 10:09

Pune Drug Racket Busted लोणीकंद, ता. 30 : अंमली पदार्थांविरोधात कारवाईचा धडाका सुरू ठेवत लोणीकंद पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली आहे. मॅफेड्रॉन (एमडी) ड्रग्जची विक्री करणाऱ्या टोळीवर सलग कारवाया करत तब्बल ६ आरोपींना अटक करण्यात आली असून, जवळपास ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुणे पोलिस आयुक्तांच्या निर्देशानुसार अंमली पदार्थ विक्रेत्यांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्याच्या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. Pune Drug Racket Busted

 

पुंजाजी जयचंद्र चौधरी (वय ४० , रा. जय मल्हार सोसायटी, फुलमळा रोड, वाघोली, पुणे मुळपत्ता मु.पो. निपाणा, ता. मोताळा, जि. बुलढाणा), राजेंद्र केरु टेळे (वय ३५ , रा. अथर्वनगर, चाकण रोड, शिक्रापुर, पुणे), करन सचिन मोहिते (वय २१ , रा. सणसवाडी, पुणे), भागीरथसिंग सज्जनसिंग राजपुरोहित (वय २८, रा. मांजरी, पुणे मुळपत्ता राजस्थान), आदिनाथ दशरथ शिर्के (वय २९ वर्षे रा. मांजरी, पुणे) व योगेश लक्ष्मण चव्हाण (वय ३७, रा. आझाद गल्ली, शहाजी चौक, शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. Pune Drug Racket Busted

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , १९ एप्रिल रोजी कटकेवाडी फाटा येथे पहिली कारवाई करत पुंजाजी चौधरी याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून २१.८६० ग्रॅम एमडी पावडर आणि आयफोनसह सुमारे ४.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर २० एप्रिल रोजी पेरणे फाटा येथे राजेंद्र टेळे आणि करण मोहिते यांना अटक करत तब्बल १४.१० लाखांचा माल जप्त करण्यात आला.

तपासाचा धागा पुढे नेत २२ एप्रिल रोजी मांजरी परिसरातून आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एमडी पावडर, कार, मोबाईल आणि रोख रक्कम असा ८.३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पुढील कारवाईत २३ एप्रिल रोजी योगेश चव्हाण याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून १४.५० लाखांच्या एमडी पावडरचा साठा जप्त करण्यात आला.Pune Drug Racket Busted

या सर्व कारवायांमध्ये एकूण १७४.९५ ग्रॅम मॅफेड्रॉन ड्रग्ज जप्त करण्यात आले असून, एकूण मुद्देमालाची किंमत ३४,९८,८०० रुपये इतकी आहे. अटक आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असून येरवडा कारागृहात ठेवण्यात आले आहेत. या कारवाईमुळे पुणे ग्रामीण भागातील ड्रग्ज माफियांचे कंबरडे मोडले असून, आणखी आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. नागरिकांनीही अशा प्रकारच्या संशयास्पद हालचालींबाबत त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. Pune Drug Racket Busted

सदरची कामगिरी पोलीस उपआयुक्त सोमय मुंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त नुतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी कंद पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिता रोकडे, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन बेंदगुडे, तुकाराम सुरवसे, पोलीस अंमलदार स्वप्नील जाधव, कैलास साळुंके, सागर जगताप, गणेश गायकवाड, संतोष अंदुरे, मल्हारी सपुरे, शुभम विनके, सुधीर शिवले, दिनेश मरकड, शंकर क्षिरसागर व संदीप पाचंगे यांच्या पथकाने केली आहे. Pune Drug Racket Busted

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

attempt-to-drive-away-a-man-on-suspicion-of-having-an-affair-with-his-wife

Pune Murder Case : पुण्यात किरकोळ वादातून तरुणाची निर्घृण हत्या; चार अल्पवयीन ताब्यात

Wednesday, 6 May 2026, 13:11

Katraj News : भिंतींच्या अरुंद फटीत अडकलेल्या चिमुकल्याची अग्निशमन दलाकडून सुखरूप सुटका

Wednesday, 6 May 2026, 12:58
Youth cheated for 99 lakh in pimpri chinchwad Pune

Pune Cyber ​​Fraud : डेटिंग ॲप, शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने दोघांची तब्बल 20 लाखांहून अधिकची फसवणूक

Wednesday, 6 May 2026, 12:16

Pune Good News : पुण्यातील गरजू, वृद्ध व अनाथांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे सन्मानपूर्वक वाटप, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचा आदर्श उपक्रम

Wednesday, 6 May 2026, 12:06
Dhule Crime: A stain on the teaching profession..! Repeated rape by giving a girl a sedative; The principal's action creates a stir in the area

Pune News : पुण्यात ९ वर्षीय मुलीवर आजोबांकडून अत्याचाराचा प्रयत्न, आरोपी वृद्धाला अटक

Wednesday, 6 May 2026, 11:01

Pune News : नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला तात्काळ फाशी द्या – मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे ग्रामस्थांची मागणी

Tuesday, 5 May 2026, 20:00
Next Post

Shirur News : न्हावरे-निर्वी रस्त्यावर झाडाला कारची भीषण धडक ; पत्नीचा जागीच मृत्यू, पतीची प्रकृती चिंताजनक, न्हावरे परिसरात शोककळा..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.