(Pune Crime) पुणे : मागील आठ वर्षापासून बेकायदेशीरपणे पुण्यात वास्तव्य करणाऱ्या २२ वर्षीय एका पाकिस्तानी तरुणाला खडक परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आठ वर्षांपासून पुण्यातील भवानी पेठेत राहत होता तरुण…!
मोहम्मद अमान अन्सारी (वय -२२) असे तरुणाचे नाव आहे. २०१५ पासून हा तरुण भवानी पेठेतील चुडामन तालीमजवळ राहत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्सारी हा २०१५ पासून अवैधरित्या पुण्यातील भवानी पेठेत मागील आठ वर्षांपासून राहत होता. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक बनावट पाकिस्तानी पासपोर्ट आढळून आला असून त्याने या पासपोर्टचा वापर करुन दुबईला देखील प्रवास केला होता.
कागदपत्र नसतानादेखील हा तरुण पुण्यातील भवानी पेठेत राहत होता. पोलिसांना या तरुणासंदर्भात गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस मागील काही दिवसांपासून या तरुणाच्या मार्गावर होते. त्यात पोलिसांना तो खडक परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यावेळी सापळा रचून त्याला गजाआड केलं आहे.
दरम्यान, अन्सारी हा २०१५ पासून हा भारतात वेगवेगळ्या ठिकाणी राहिला. त्यात पुण्यात त्याचं वास्तव्य होतं. मात्र तो पुण्यात कशाला आला होता, याची माहिती पोलीस घेत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Pune Crime News | पुण्यात लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार; तरुणी गर्भवती