Pune Crime| शिक्रापूर : एका मद्यपीने पाबळ (ता. शिरूर) येथील पोलीस चौकीवर दगडफेक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
बाळासाहेब काशिनाथ साकोरे (वय-५० रा. महादेववाडी केंदूर, ता. शिरुर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार गणेश गुलाबराव सुतार रा. शिक्रापूर, ता. शिरुर) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्रापूर पोलीस ठाण्याचे औट पोस्ट असलेल्या पाबळ पोलीस चौकीत पोलीस कर्मचारी काम करत असताना एक मद्यपी व्यक्ती मोठमोठ्याने आरडाओरडा करत पोलीस चौकीच्या आवारात आला.
यावेळी पोलीस कर्मचारी त्याला समजावून सांगत होते. तेव्हा दारुड्याने मोठ्याने आरडाओरडा करत शांततेचा भंग करत पोलीस चौकीच्या भिंतींवर दगडफेक केली.
दरम्यान, दगडफेक केल्यानंतर पोलिसांनी आरोपी साकोरे याला ताब्यात घेतले. त्याच्यावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गणेश सुतार करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Baramati Crime : बारामती तालुक्यातील सांगवी येथे तरूणाचा दगडाने ठेचून खून ; परिसरात खळबळ..!
Pune Crime | संतापजनक ! दिघी येथे लष्करात स्वयंपाक करणाऱ्या आचाऱ्याने चिमुकलीवर केला अत्याचार