Pune Crime | पुणे : क्रिकेट खेळण्याच्या वादातून मावस भावाने तीन अल्पवयीन बहिणींना लोखंडी रॉड, पाईपने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. पुण्यातील वारजे भागात शनिवारी (ता. २५) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास वारजेतील दांगट वस्ती जवळ घडली.
याबाबत कृष्णा सहानी यांनी वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रामनाथ सहानी, राम सहानी आणि इतर दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
बहिणी गंभीर जखमी…
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे दोघेही मावस बंधू आहेत. या दोघांमध्ये मैदानावर क्रिकेटच्या खेळावरून काही वाद झाले होते. या गोष्टीचा राग मनात ठेवून आरोपींनी फिर्यादी कृष्णा याला मारण्यासाठी थेट घरात प्रवेश केला. यावेळी आरोपींना कृष्णा दिसला नाही त्यामुळे त्यांनी घरातील उपस्थित असलेल्या महिलांना लोखंडी रॉडने मारहाण केली.
या हल्ल्यात कृष्णा यांची आई तसेच तीन लहान बहिणी यांच्यावर रामनाथ सहानी, राम सहानी आणि इतर दोन साथीदारांनी हल्ला केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या लहान मुलींना नागरिकांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले असून यातील दोन जणींची प्रकृती गंभीर आहे. या घटनेनंतर वारजे पोलिस ठाण्यात आरोपींच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Maharashtra Govt News | शेततळ्यासाठी राज्यात ४ हजारावर शेतकऱ्यांच्या अर्जावर प्रक्रिया सुरू