Pune Crime | पुणे : मुंढव्यातील केशवनगर परिसरात मैत्रिणींसोबत राहणार्या एका 27 वर्षीय सॉफ्टवेअर डेव्हलपर तरूणीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
अजिंक्य रमेश सावंत (26, रा. डी. 32, मेघवाडी, डॉ. एस एस राव रोड, लालबाग, लोअर परळ, मुंबई) असे आरोपीचे नाव आहे.
त्याने नग्न अवस्थेत तरूणीशी लगट करण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी 27 वर्षीय तरूणीने फिर्यादी दिली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत तरूणी ही येरवडा परिसरातील एका कंपनीत सिनीअर सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करते. ती तिच्या इतर मैत्रिणींसोबत मुंढव्यातील केशवनगर परिसरात 3 बीएचके फ्लॅटमध्ये राहण्यास आहे.
7 एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पिडीत तरूणीच्या मैत्रिणीचा बॉयफ्रेन्ड अजिंक्य रमेश सावंत हा मुंबईवरून त्यांच्या फ्लॅटवर आला. पिडीत तरूणीच्या मैत्रिणीने अजिंक्य आणि पिडीत तरूणीची ओळख करून दिली. त्यानंतर ते सर्वजण बाल्कनीमध्ये गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी अजिंक्य हा दारू पित होता. 8 एप्रिल रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास पिडीत तरूणी तिच्या रूममध्ये झोपण्यासाठी गेली.
सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास पिडीत तरूणीला तिच्या अंगावरून कोणीतरी हात फिरवत असल्याची जाणीव झाली. तिला जाग आणि त्यावेळी तिच्या समोर अजिंक्य हा पुर्ण नग्न अवस्थेत उभा होता. त्याने तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. खांद्याला व हाताला पकडून तो पिडीत तरूणीच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न करीत होता. पिडीत तरूणी तात्काळ तिच्या रूमबाहेर पडली. त्यानंतर तिने मित्राला कॉल केला आणि नंतर पोलिसांकडे धाव घेतली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pimpri-Chinchwad Crime : उशिरा जेवण न दिल्याने हॉटेल चालकाला जबर मारहाण; चिखलीतील प्रकार
Pimpri : भाजपाचा कार्यकर्ता असल्याचा अभिमान ! शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांची भावना