Pune Crime | पुणे : शहरातील विविध भागातून दुचाकी वाहने चोरणाऱ्या दोन सराईतांना गुन्हे शाखेच्या युनिट चारने सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून चोरीचे ८ गुन्हे उघडकीस आणत साडे चार लाखांचा ऐवज जप्त केला आहे.
गुन्हे शाखेच्या युनिट चारची कारवाई ….
गौरव उर्फ पिंट्या मच्छिंद्र कुसाळे (वय ३८, रा. येरवडा) व संतोष उर्फ समीर अशोककुमार सक्सेना (वय २९) यांना अटक केली आहे. त्यांना येरवड्यातील साळवे भाजी मार्केट परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत त्यांच्याकडून येरवडा, चंदननगर, लष्कर, रांजणगाव तसेच म्हाळुंगे या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण ८ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पथक हद्दीत गस्त घालत असताना पोलिसांना त्यांच्याबाबत माहिती मिळाली. त्यानूसार, वरिष्ठ निरीक्षक गणेश माने व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. त्यांच्याकडे आणखी चौकशी सुरू आहे.
पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!