Pune Crime | पिंपरी-चिंचवड : महिले सोबत नकळत काढलेले फोटो इन्स्टाग्रामवरून पोस्ट करून पतीला दाखवण्याची धमकी देत बदनामी करत पैशांची मागणी केल्याचा प्रकार भोसरीतून समोर आला. याप्रकरणी आरोपीस पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. हा प्रकार 1 एप्रिल पासून सुरु होता. फेक इन्स्टाग्राम अकाऊंटवरून महिलेची बदनामी आरोपीने केली होती.
दिपक लक्ष्मण ठाकूर (रा. धुळे) असे आरोपीचे नाव असून भोसरी पोलीसांनी त्यास बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकऱणी पीडीत महिलेने तक्रार दाकल केली होती. त्यावरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला यांच्या ओळखीचा आरोपी याने kal_yani211101 या इन्स्टाग्रामवरून फिर्यादी सोबत नकळत काढलेले फोटो पोस्ट करून ते फिर्यादीच्या पती, मित्र व नातवाईकांना शेअर करण्याची धमकी दिली.
तसेच ई सेवा केंद्रात झालेली नुकसान भरपाई म्हणून 70 हजार रुपये दे नाही तर फोटो व्हायरल करेन अशी धमकी महिलेला दिली. याप्रकारानंतर महिलेने भोसरी पोलीसात धाव घेतली. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pimpri Crime | कोयता गॅंगची दादागिरी ! आम्ही इथले भाई म्हणत तरुणावर कोयत्याने वार; चिखलीतील घटना
Pimpri Crime : जमिनीच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण ; दिघी पोलीसात गुन्हा दाखल
Pimpri Crime : घराजवळ उभी केलेली सुमो गाडी चोरट्यांनी पळविली, पिंपळे गुरवमधील प्रकार