Pune Crime | पौड, (पुणे) : कुंभेरी (ता मुळशी) ग्रामपंचायत हद्दीत एका मुलानेच आपल्या वडिलाला मारहाण करुन खून केल्याची घटना घडली आहे. शनिवारी (ता. ०६) रात्री कुंभेरी गावचे हद्दीत हि घटना घडली आहे.
संभाजी बुडण शिंदे (वय -५८ रा. कुंभेरी ता मुळशी जि. पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर संजय संभाजी शिंदे असे खून करणाऱ्या आरोपी मुलाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस पाटील वसंत लक्ष्मण दळवी यांनी पोलिसांना खबर दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजी हा दररोज दारू पिउन पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असे. याचा राग मनात धरून मुलानेच वडील संभाजी शिंदे यांना लाथाबुक्क्याने त्यांचे डोक्यावर, तोंडावर, हातापायावर, मारहाण केली. त्यानंतर मोठा दगड उचलुन डोक्यात घालुन त्यांचा खुन केला.
दरम्यान, पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मुलगा संजय शिंदे याला अटक करण्यात आली आहे.हवेली विभागीय अधिकारी ढोले पाटील व प्रभारी अधिकारी मनोज कुमार यादव यांनी सदर ठिकाणी भेट दिली. घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मृगदीप गायकवाड हे करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune Crime : घर का भेदी लंका ढाए! सराफी व्यावसायिकाला कारागिरांनीच घातला तब्बल २२ लाखाला गंडा..