Pune Crime | पिंपरी-चिंचवड : महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार शहरातील वाकड येथील भूमकर चौकातून समोर आला आहे. टॅंकर चालकाने ट्राफिकमध्ये उभ्या असलेल्या कार चालक महिलेला अश्लील शिवीगाळ केली. यावेळी वाहतूक पोलीस आले असता साहेब तुम्ही माझी कम्प्लेंट घ्या. हिच्याकडे मी नंतर बघतो. माझा मालक इथला गाववाला आहे असल्याची धमकी दिली. हा प्रकार शनिवारी (दि. 29) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडला आहे.
याप्रकरणी 41 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महिलेल्या तक्रारीवरून टॅंकर चालक संदीप काकासाहेब सुडके (वय 24, रा. हिंजवडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 41 वर्षीय कार चालक महिला या भूमकर चौकातून आपल्या कारने जात होत्या. दरम्यान याठिकाणी वाहतूक कोंडी झाली त्यामुळे त्यांची कार थांबली. यावेळी पाठीमागून आलेल्या आरोपी टँकर चालकाने जोरजोरात हॉर्न वाजवला. तक्रारदार महिलेला अश्लील शिवीगाळ केली.
दरम्यान वाहतूक पोलीसांनी त्याला समजावून सांगत असताना त्याने दारुची नशा केल्याचे लक्षात आले. नशेत त्याने पोलिसांना साहेब तुम्ही माझी कम्प्लेंट घ्या. हिच्याकडे मी नंतर बघतो. माझा मालक इथला गाववाला आहे म्हणत दमदाटी केली. असे तक्रारीमध्ये म्हटले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.