Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Manchar News : शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍यावर बिबट्याचा हल्ला ; शेतकरी जखमी, आंबेगाव परिसरातील घटना..!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 30 April 2023, 15:44

Manchar News | मंचर, (पुणे) : भरदिवसा उसाच्या शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना शनिवारी (ता. २९) घडली आहे. पारगाव (ता. आंबेगाव) येथील तनिष्का मंगल कार्यालयाजवळ ही घटना घडली आहे.

राजाराम कोंडिबा थोरात (वय – ६०, पारगाव, ता. आंबेगाव) असे जखमी झालेल्या शेतकर्‍याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राजाराम कोंडिबा थोरात हे शेतकरी असून ते पारगाव फाट्याजवळ कौठ मळा येथे राहतात. त्यांची तनिष्का मंगल कार्यालयाजवळ उसाची शेती आहे. दुपारी ते उसाच्या शेतात पाणी देण्यासाठी गेले होते. त्या वेळी उसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला.

 

बिबट्याने शेतकरी थोरात यांच्या दोन्ही हातांना व पायांना पंजा मारून जखमी केले. अचानक हल्ला झाला तरी देखील प्रसंगावधान राखून थोरात यांनी बिबट्याला पळवून लावले. या घटनेची खबर वनविभागाला मिळताच वनरक्षक साईमाला गीते घटनास्थळी हजर होऊन जखमी राजाराम थोरात यांना उपचारासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

दरम्यान, पारगावचे सरपंच बबनराव ढोबळे व माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे यांनी जखमी राजाराम थोरात यांची विचारपूस केली. परिसरात मागील महिन्यात मेंढपाळावर झोपेत असताना बिबट्याने हल्ला केला होता, परंतु वन विभागाने पिंजरा लावल्यानंतर बिबट्या जेरबंद झाला होता. त्यानंतर पुन्हा ही घटना घडल्याने शेतकरीवर्गात घबराट पसरली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09

दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण! कमरुद्दीनने कुटुंबीयांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं, 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनंही केले लंपास; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:59
Next Post

Accident | जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कारचा अपघात ; MBBS चे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू ; तर पाचजण गंभीर जखमी..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.