(Pune Crime News) शिवाजीनगर, (पुणे) : महिला वकिलास शिवाजीनगर न्यायालयात भर दिवसा मारहाण करुन विनयभंग करण्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. अंमली पदार्थ विक्री प्रकरणातील आरोपीचा जामीन करुन दिल्यानंतर हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
वसीम सलीम शेख (वय ३७, रा. बुधवार पेठ) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी एका ३४ वषार्चा महिला वकिलांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना शिवाजीनगर न्यायालयातील नवीन इमारतीतील जेन्टस बार रुमच्या जवळ सोमवारी दुपारी साडेतीन वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वसीम शेख हा महिला वकीलांच्या ओळखीचा आहे. त्याच्या सांगण्यावरुन त्यांनी अंमली पदार्थ विक्रीच्या गुन्ह्यातील आरोपीचा जामीन करुन दिला होता.
दरम्यान, वसीम याने फिर्यादी यांच्याशी वाद करुन अश्लिल शिवीगाळ केली. त्यांचा दुपट्टा ओढून तो फेकून हाताने व लाथाने मारहाण करुन त्यांचा विनयभंग केला. पोलीस उपनिरीक्षक साळवे तपास करीत आहेत.