(Pune Crime News) पुणे : एकतफ्री प्रेमप्रकरणातून तरुणीचा वारंवार पाठलागकरून तिला त्रास दिल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच या तरुणीला लग्न न केल्यास आत्महत्या करण्याचीही धमकी दिली आहे.
याप्रकरणी माणिक मनोहर ढेकळे (वय २१, रा. देवाची ऊरळी) याच्यावर अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत १८ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. तक्रारदार तरुणी डेक्कन परिसरात राहण्यास आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ती माणिक याला ओळखते. माणिक हा तिला मला खुप आवडते म्हणून बोलत होता. परंतु, तिने त्याला नकार दिला. नकार दिल्यानंतर देखील माणिक हा भेटण्यासाठी वेळोवेळी पाठलाग करत होता.
तसेच, तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. त्यान एकेदिवशी या तरुणीला लग्न न केल्यास आत्महत्या करेल अशी धमकीही दिली. त्यानंतर या तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.