पुणे Pune Crime News : पुण्यातील (Pune) वारजे माळवाडीत दोन स्वयंघोषित भाईंनी (self-proclaimed) बिअर शॉपीतून (beer-shop) दारूचे बॉक्सच (boxes-of-liquor) जबरदस्तीने उचलून नेण्याचा प्रयत्न केला. या दोघांना विरोधकरत बॉक्सचे पैसे मागितल्यानंतर त्यांनी आम्ही इथले भाई आहोत म्हणत त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून नेण्याचा प्रयत्नकरत हप्ता देण्यासाठी धमकावल्याची घटना घडली. रोझरी शाळेजवळील रसराज बिअर शॉपीत हा प्रकार रात्री पावणे दहाच्या सुमारास घडला आहे. या घटनेनंतर एकच दहशत निर्माण झाली आहे. (Pune Crime News)
दोन जणांवर गुन्हा दाखल
याप्रकरणी ४७ वर्षीय व्यक्तीने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची बिअर शॉपी आहे. रात्री पावणे दहाच्या सुमारास दोघेजन त्यांच्या शॉपीत आले. त्यांनी जबरदस्तीने बिअरचे दोन बॉक्स उचलणून नेण्यास सुरूवात केली. पण, तक्रारदारांनी त्यांना अडवत पैसे मागितले. त्यावेळी दोघांनी तु कोणाला पैसे मागतो. तुला दुकान चालवायचे का आम्ही इथले भाई आहोत असे म्हणत त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावला. तसेच, त्यांना हप्ता देण्याची मागणी केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.