( Pune Crime News ) पुणे : उधारीवर दागिने घेत त्याचे पैसे न देता फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. कोंढवा बुद्रुक येथील सराफी व्यावसायिकाचा विश्वास संपादनकरून दाम्पत्याने व्यावसियिकाकडून उधारीवर तब्बल दोन लाख रुपयाचे दागिने घेतले मात्र त्याचे पैसे दिले नाही. हा प्रकार जानेवारी २०२१ मध्ये घडली आहे.
फसवणूक प्रकरणी ३८ वर्षीय व्यावसायिकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानूसार, दाम्पत्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दाम्पत्य पिसोळी भागातील आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांचे कोंढवा बुद्रुक परिसरात जलेरी सिल्वर आणि गोल्ड नावाचे दुकान आहे. दरम्यान दाम्पत्याने त्यांच्या दुकानात येऊन त्यांना दागिने खरेदीसाठी बोलून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांना वेगवेगळी बहाणेबाजी केली व त्यांच्याकडून उधारीवर १ लाख ९७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने घेतले. परंतु, अद्यापपर्यंत त्यांचे पैसे परत न करता त्यांची फसवणूक केली.
पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Crime News : दामदुप्पट करण्याचे आमिष पडले महागात; महिलेची तब्बल 40 लाखांची फसवणूक, दौंडमधील प्रका