पुणे : Pune Crime News – सायबर चोरट्यांकडून (pune-cyber crime-news) नवीन क्लुप्त्यांनी (thieves-new-clupee) पुणेकरांच्या पैशांवर डल्ला मारला जात असून, एका व्यक्तीला अंकाऊट व्हेरीफिकेशनच्या बहाण्याने या चोरट्यांनी तब्बल ७८ हजारांना गंडा घातला आहे. त्यांना फोन पेमध्ये युपीआय आयडी तयार करण्यास सांगितला. त्यानंतर त्यांच्या खात्यातून पैसे ट्रान्सफरकरून घेत त्यांची फसवणूक केली. (Pune Crime News)
याप्रकरणी ५८ वर्षीय व्यक्तीने उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, अनोळखी मोबाईल धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला होता. संबंधित व्यक्तीने त्यांना तुमचे अंकाऊट व्हेरीफिकेशन करायचे आहे अशी बतावणी केली. त्यांना फोन पेमध्ये युपीआय आयडी तयार करा असे सांगितले. त्यांनी आयडी तयार केल्यानंतर या क्रमांक धारकाने त्यांच्या खात्यातून ७८ हजार रुपये ट्रान्सफरकरून फसवणूक केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.