Pune Crime पुणे : उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये आलेल्या एका १९ वर्षीय अविवाहित तरुणीने बाथरुममध्ये जाऊन नवजात अर्भकाला खिडकीतून बाहेर फेकून दिल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या घटनेत अर्भकाचा मृत्यु झाला असून सिंहगड रोड पोलिसांनी गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहणार्या एका १९ वर्षाच्या तरुणीवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!
आरोपी १९ वर्षाची तरुणी मानाजीनगर येथील हॉस्टेलमध्ये राहते. शारीरिक संबंधातून ती गर्भवती राहिली होती. आपले दिवस भरत आल्याचे लक्षात आल्यावर ती नर्हे येथील श्री काशीबाई नवले हॉस्पिटल येथे उपचारासाठी आली होती. यावेळी पाठीचे दुखणे व अशक्तपणा आल्याची तक्रार तिने केली. ती ८ महिन्यांची गर्भवती असल्याचे तिने लपवून ठेवले.
हॉस्पिटलमधील कॅज्युअल्टी वॉर्ड शेजारील रुग्णांच्या बाथरुममध्ये जाऊन तिने एका मुलीला जन्म दिला. त्या नुकत्याच जन्मलेल्या अर्भकाला तिने टॉयलेटच्या खिडकीतून बाहेर फेकून दिले. त्यामुळे या अर्भकाचा मृत्यु झाला. हा प्रकार समोर आल्यानंतर तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत असून पोलीस उपनिरीक्षक लाड तपास करीत आहेत