Pune Crime पुणे : पत्नीला शेजाऱ्याने त्याच्या दुचाकीवरून घरी सोडून दिल्याच्या रागातून पतीसह अन्य् तिघांनी मिळून एकास बेदम मारहाण केली आहे. पुणे शहरातील हडपसरमधील साडेसतरा नळीत ही घटना घडली आहे. या मारहाणीत एकजण गंभीर जखमी झाला आहे. शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली आहे.
याप्रकरणी अंतम गायकवाड (वय ३७ राहणार हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून तिन जणांच्या विरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसर, आरोपी व अंतम हे एकमेकांचे शेजारी आहेत. दरम्यान अंतम याने आरोपीच्या पत्नीला बाहेरून घरी आणून सोडले. ते महिलेच्या पतीने पाहीले यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर तिघांनी मिलून अंमतच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केले तसेच लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत अंतम गंभीर जखमी झाले. दरम्यान यांचे भांडण सोविण्यासाठी आलेल्या बहिण व भाच्यास सुद्धा तिघांनी मारहाण केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.