(Pune Crime) पुणे : दुकानात कामवर ठेवलेल्या कामगारानेच अपहार केल्याची घटना शहरातील खराडी (Pune Crime) येथून उघडकील आली आहे. कामगारानेच मालक व ग्राहकांची आर्थिक फसवणूक करत तब्बल पावणे तीन लाखांचा अपहार केला आहे.
चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…!
याप्रकरणी सुरेश नागोरी (वय ४८) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून राहुल हनुमंत आंबेकर (रा. सासवड) याच्यावर अपहार केल्याप्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे खराडी भागात मार्बलचे दुकान आहे. त्यांच्या दुकानात राहुल हा कामगार म्हणून काम करत होता. दुकानात काम करत असताना त्याने दुकानदार व ग्राहक यांचा सुरुवातीला विश्वास संपादन केला. त्यानंतर ग्राहकांना दुकानातील मार्बल देतो अशी बतावणी केली व त्यांच्याकडून स्वत:च्या गुगल पेवर वेळोवेळी एकूण २ लाख ८० हजार रुपये घेतले.
परंतु, दुकानातील दिलेल्या मालाची ऑर्डरची न नोंद करता तसेच ग्राहकांकडून घेतलेली रक्कम देखील दुकानात न देता अपहार केला. हा प्रकार समोर आल्यानंतर त्याने पैसे देण्याचे मान्य केले. त्यानंतर दोन चेक दिले. पण ते चेकही बाऊन्स झाले. यानंतर तक्रारदारांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Fraud News : नोकरी लावण्याचे आमिष दाखवत वर्गमित्रानेच केली फसवणूक ; खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Crime News : दामदुप्पट करण्याचे आमिष पडले महागात; महिलेची तब्बल 40 लाखांची फसवणूक, दौंडमधील प्रकार!